पुणे मार्केटमध्ये हंगामातील पहिली आंबा पेटी दाखल

 पुणे मार्केटमध्ये हंगामातील पहिली आंबा पेटी दाखल

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात आल्हाददायक थंडीचे वातावरण असताना पुणे मार्केट यार्डमध्ये या हंगामातील पहिली आंबा पेटी आज दाखल झाली. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देवगडमधून हापूस आंब्याच्या मोजक्या पेट्यांची आवक सुरू झाली होती. या वर्षीही डिसेंबरपासून आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली होती. ही आवक अशीच होत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने सध्या बाजारात आंबा पाहायलाही मिळत नाही. हीच परिस्थिती यापुढे कायम राहिल्यास मार्चनंतरच हापूस आंब्याची आवक होईल, असे घाऊक व्यापारी सांगत आहेत. सामान्य लोकांना तोपर्यंत आंबा चाखण्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

आता १५ मार्चनंतर बाजारात कोकणातील हापूस आंबा येऊ शकेल, असा अंदाज घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी वर्तवला आहे. बदलत्या हवामानामुळे व्यापाऱ्यांचा आंब्याच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. औषध फवारणी, तर नियमित करावी लागते, मात्र अशा परिस्थितीमुळे फवारणी तीन-चार वेळा करावी लागते. त्यामुळे हा देखभालखर्च वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

SL/KA/SL

18 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *