या कंपनीने दिली 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर

 या कंपनीने दिली 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी करणार आहे. अकासा एअरने एकाच वेळी 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन उड्डाणे सुरू करण्यासाठी कंपनी या विमानांचा वापर करेल. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमात अकासाने याची घोषणा केली आहे. अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांच्या म्हणण्यानुसार, या मोठ्या आणि ऐतिहासिक विमान ऑर्डरमुळे या दशकाच्या अखेरीस कंपनीला जगातील टॉप 30 विमान कंपन्यांमध्ये स्थान मिळण्यास मदत होईल.

अकासा एअरने येत्या काही वर्षांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. सीईओ विनय दुबे म्हणाले, आमच्या ताफ्यात नवीन विमानांची भर पडल्याने आम्हाला आमच्या ऑपरेशन्सची ताकद वाढण्यास मदत होईल. आम्ही नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करू शकू.”

अकासा एअरच्या या ऑर्डरमध्ये 737 मॅक्स 10 आणि 737 मॅक्स 8-200 जेट्सचा समावेश आहे. अकासाला 2032 पर्यंत या विमानाचा पुरवठा केला जाईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. यामुळे कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विस्तार योजनांना बळ मिळेल. अकासा एअरने 2021 मध्ये 72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली होती. यानंतर कंपनीने जून 2023 मध्ये चार बोईंग 737 मॅक्स 8 विमानांची ऑर्डर दिली. जानेवारी 2024 मध्ये होणार्‍या या नवीनतम करारामुळे अकासाची एकूण ऑर्डर बुक 226 विमानांपर्यंत वाढली आहे. अकासा एअर सध्या 22 विमानांचा ताफा चालवते आणि पुढील आठ वर्षांत एकूण 204 विमाने कंपनीला मिळतील.

SL/KA/SL

18 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *