बुद्धविहार परिसर स्वच्छतेची मोहीम वस्तीवस्तीत राबवावी

मुंबई दि. १७ (एम एमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज बांद्रा पूर्व शास्त्रीनगर येथील कुशीनारा बुद्ध विहार परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. स्वतः हाती झाडू घेऊन ना.रामदास आठवले यांनी कुशीनारा बुद्धविहार परिसर स्वच्छ केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ तीर्थ मोहीम अभियान नुसार ना.रामदास आठवले यांनी राज्यभर स्वच्छ बुद्ध विहार परिसर मोहीम राबविणे सुरू केले आहे.
आपल्या परिसरात सफाई कामगार सफाईचे काम करतात.मात्र आपल्या घरा प्रमाणे आपला परिसर ही स्वच्छ ठेवला पाहिजे. केवळ सफाई कामगारांवर सोपवून चालणार नाही. आपण ही आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी दक्ष राहिले पाहिजे आणि आपणही परिसर स्वच्छतेसाठी सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन आज ना.रामदास आठवले यांनी केले.
यावेळी या स्वच्छता मोहिमे चे संयोजक रिपाइंचे रोजगार आघाडी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमित तांबे आणि रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; जिल्हा अध्यक्ष साधू कटके; सुमित वजाळे; किसन रोकडे; रतन अस्वारे; विदर्भ नेते मोहन भोयर ; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
SW/KA/SL
17 Jan 2024