३० कोटी भारतीयांचे आयुष्मान कार्ड झाले तयार

 ३० कोटी भारतीयांचे आयुष्मान कार्ड झाले तयार

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY) देशात आतापर्यंत 30 कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षात 16.7 कोटी कार्ड बनवण्यात आले असून चालू वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत 7.5 कोटी कार्ड बनवण्यात आले आहेत. म्हणजेच देशात दर मिनिटाला 181 कार्ड तयार होत आहेत आहेत.योजनेंतर्गत आतापर्यंत 6.2 कोटी लोकांवर रुग्णालयांमध्ये उपचार केले गेले आहेत, ज्यासाठी सरकारला 79,157 कोटी रुपये खर्च आला आहे.उत्तर प्रदेश (4.83 कोटी), मध्य प्रदेश (3.78 कोटी) आणि महाराष्ट्रात (2.39 कोटी) सर्वाधिक कार्ड तयार करण्यात आली आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे की ही योजना समाजात समानतेला प्रोत्साहन देत आहे. एकूण 30 कोटी कार्डांपैकी 49% कार्डे महिलांसाठी आहेत. त्याच वेळी, योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्यांपैकी 48% महिला आहेत. PM मोदींनी 23 सप्टेंबर 2018 रोजी ही योजना सुरू केली.आयुष्मान योजनेचा तिसरा टप्पा (आयुष्मान 3.0) 17 सप्टेंबरपासून सुरू झाला. तिसऱ्या टप्प्यात कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यानंतर लोकांची ओळखपत्रे वेगाने बनवली गेली. लोक ऑनलाइन नोंदणी करून हे काम करत होते.

या योजनेसाठी काही पात्रता निकष विहित करण्यात आले आहेत. ही पात्रता असलेले लोक आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकतील. आयुष्मान योजनेसाठी पात्रता तपासण्यासाठी तुम्ही १४५५५ वर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची पात्रता pmjay.gov.in साइटवर देखील तपासू शकता.

या योजनेत जुनाट आजारांचाही समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च कव्हर केला जातो. यामध्ये वाहतुकीवरील खर्चाचा समावेश होतो. यामध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 5.5 कोटींहून अधिक लोकांनी उपचार घेतले आहेत.

आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल फोनवरही आयुष्मान कार्ड अॅपद्वारे अर्ज करण्याची सुविधा दिली आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर लाभार्थीला मोबाईल क्रमांकाच्या मदतीने नोंदणी करावी लागेल. यानंतर, नोंदणी प्रक्रिया ओटीपी, आयरिस आणि फिंगरप्रिंट आणि फेस-आधारित व्हेरिफिकेशनच्या मदतीने पूर्ण करावी लागेल.येथे तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकार फोटो, पॅन कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यानंतर, तुमच्या विनंतीची पडताळणी केल्यानंतर सरकार तुमचे नाव योजनेत नोंदणी करेल. तथापि, या प्रक्रियेपूर्वी, आपण त्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासावे.

SL/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *