डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे आणि संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. प्रभा अत्रे यांची भाची मनीषा रवी प्रकाश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, तहसिलदार राधिका बारटक्के, स्वरमयी गुरुकुलचे सदस्य यांच्यासह गायन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *