तीन पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या विदुषी गायिका डॉ प्रभा अत्रे

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे आज पहाटे ३.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्काने पुण्यात दु:खद निधन झाले. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना १९९० मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले. २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण‘ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.
भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे.आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत असत. ‘ख्याल’ गायकीसह ‘ठुमरी’, ‘दादरा’, ‘गझल’, ‘उपशास्त्रीय संगीत’, ‘नाट्य संगीत’, ‘भजन’ व ‘भावसंगीत’ गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होतं.
SL/KA/SL
13 Jan. 2024