ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या मिरच्या भारतातल्या हिवाळ्यात शक्यतो मिळतात तेव्हा करायचा प्रकार आहे. जहाल-अतीजहाल प्रकरण होऊ शकतं/असतं (मिरच्यांवर अवलंबून) पण तितकंच टेस्टीही. जरूर करून पाहा.
– एक पाव ओल्या लाल मिरच्या; धूवून, कोरड्या करून, डेखं काढून घेतलेल्या
– मिरच्यांच्या निम्मा लसूण, सोलून
– मिरच्या वाटायला लागेल तसा ताज्या लिंबांचा रस; तरी प्रमाण म्हणून पाव ते अर्धी वाटी लागतो शक्यतो
– मीठ चवीनुसार
– चमचाभर जिरे
– चमचाभर मोहोरी
– पाव चमचा चांगला हिंग
– अर्धी- पाऊण वाटी तेल
मिरच्या, लसूण, जिरे, मीठ एकत्र करून वाटायचं. लागेल तसा लिंबाचा रस वापरायचा.
नंतर तेल मोहोरी हिंगाची फोडणी करून त्यात ठेचा परतायचा.
रंग अजून जरा डार्क होतो अन कडेनी तेल सुटतं शिजल्यावर असं झालं की गार करून घ्यायचा.
आता जरा चाखून पाहून मीठ आणि लिंबाचा रस हवा असेल तर असं करून हवाबंद बरणीत फ्रिजात ठेवायचा. १५-२० दिवस ते महिनाभर सहज टिकतो. Crushed wet red chilies
ML/KA/PGB
5 Oct 2024