Air India कडून फक्त १,७९९ रुपयांत विमानप्रवासाची ऑफर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा म्हणजे पर्यटनाचा ऋतू. देशभरात थंडीमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणात प्रवास करायला पर्यटक उत्सुक असतात. वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य दिलं जातं.विमानाने आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं.त्यासाठी टाटा ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेली विमान कंपनी एअर इंडियाने एक भन्नाट ऑफर आणली आहे. यामध्ये केवळ १७९९ मध्ये तुम्ही भारतातील अनेक शहरांमध्ये विमान प्रवास करू शकता.
एअर इंडियाची सब्सिडियरी एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. एअर इंडियाने ‘टाइम टू ट्रॅव्हल’ मोहिमेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केवळ १,७९९ रुपयात देशातील काही निवडक शहरात विमान प्रवास करण्याची संधी आहे. ही ऑफर ११ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२५ दरम्यान बुक केलेल्या तिकीटावर मिळणार आहे.
एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापर्यंत हीऑफरसुरू राहणार आहे. या ऑफरमध्ये बेंगळुरु-चेन्नई, दिल्ली-जयपूर, बेंगळूरु-कोची, दिल्ली-ग्वाल्हेर आणि कोलकाता-बागडोगरासारी मोठी शहरे सामील आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरमध्ये प्रवाशांना केवळ १, ७९९ रुपयात विमान प्रवासाची संधी आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. जर तुम्ही कमी तिकीट दरात देशातील वेगवेगळ्या शहरांना भेटी देणार असाल तर या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
एअर इंडिया सोबतच टाटा समूहाची एअरलाइन्स कंपनी विस्तारानेही आपल्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी ऑफरची घोषणा केली आहे. विस्ताराने विशेष ऑफरची घोषणा केली आहे. विस्ताराच्या या ऑफरनुसार अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवाशांना विशेष सवलतीचा लाभ मिळत आहे. विमान कंपनीने ९ जानेवारी २०१५पासून ही ऑफर सुरु केली आहे.
ML/KA/SL
10 Jan. 2024