काँग्रेसनं नाकारलं अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

 काँग्रेसनं नाकारलं अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील काही मोजक्याच लोकांना अयोध्येमध्ये होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. जेमतेम काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यातआला आहे. देशातील बहुतांश लोकांमध्ये राम मंदिराबाबत उत्साह दिसून येत असला तरी काही घटकांमध्ये राम मंदिर हा भाजपचा राजकीय अजेंडा असल्याची चर्चा रंगली आहे. देशातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे नाकारल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलंय. राममंदिराचा हा कार्यक्रम त्यांनी आरएसएस आणि भाजपचा असल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या अजेंडाचा भाग म्हणून अपूर्ण मंदिराचं उद्घाटन केल्याचा आरोपही भाजपवर त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना राम मंदिराच्या (lord ram) उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय प्रकल्प बनवल असल्याचं त्यांनी म्हटल आहे. ते पुढे म्हणाले की अपूर्ण मंदिराचं उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपचे म्हणणे आहे की, काँग्रेसला यायचे नसेल, तर ती त्यांची मर्जी आहे. आम्ही आमंत्रणं पाठवली आहेत, त्यांना यायचे नसंल तर काही हरकत नाही.

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, यूपीचे राज्यपाल आणि विविध क्षेत्रातील देशातील नावाजलेले सुमारे अडीच हजार लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहेत. अभिषेक होण्यापूर्वी एक आठवडा अयोध्येत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे पाहुण्यांची यादी तयार केलीय. पाहुण्यांच्या यादीत जवळपास 150 समाजातील लोकांचा समावेश आहे. या सर्वांना निमंत्रणं मिळाली आहेत, याची खात्री केली जात आहे.

SL/KA/SL

10 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *