मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’ च्या कार्यक्रमाला राम नाईकांची हजेरी

 मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’ च्या कार्यक्रमाला राम नाईकांची हजेरी

मुंबई दि.10( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे एक लाख दहा हजार निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे प्रतिनिधीत्व करणारी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’ ही निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, तळमळीने व सातत्य लढणारी संस्था आहे. या संस्थेने 1 जानेवारी 2024 रोजी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

गेल्या 5 दशकातील कार्य, केवळ निवृत्तीवेतन धारक नाही तर समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावे, असा संस्थेचा प्रयत्न आहे. या संस्थेचा सुवर्ण महोत्सव शुभारंभ शनिवार, 13 जानेवारी 2024 रोजी, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत संपन्न होणार असून या कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संस्था कार्याची माहिती करुन देणा-या तसेच सर्वथैव सक्षम (आर्थिक, शारीरिक, मानसिक) ज्येष्ठ परिवाराच्या अनुषंगाने मान्यवर लेखकांचे लेख समाविष्ट असलेल्या एका स्मरणिकेचे प्रकाशन या समारोह प्रसंगी होणार आहे. विशेष बाब म्हणजे, कला, क्रीडा, संगीत, नाटक, सिनेमा, सामाजिक कार्य इ. विषयात उल्लेखनीय कार्य केलेल्या सेवानिवृत्त मंडळींचा प्रातिनिधीक स्वरुपाचा कौतुक करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ या शुभारंभ समारोहात होणार आहे. निवृत्तीवेतन धारकांनी या सुवर्ण महोत्सव ( 1974 – 2024)शुभारंभ समारोहाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’ चे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर यांनी केले आहे.

या शुभारंभ समारोहासाठी आवश्यक देणगी प्रवेशिका, बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’च्या कार्यालयात तसेच मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, वाशी, गोरेगांव, बोरीवली या सर्व केंद्रावर उपलब्ध आहेत,अशी माहिती ही क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

SW/KA/SL

10 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *