२०० कोटींच्या कर्जवसुली साठी वैद्यनाथ कारखान्याचा होणार लिलाव

बीड, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यावरील थकीत कर्जापोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून या पोटी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. यासाठी ची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी पार पडणार असल्याचेही नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे.
या नोटीसीमध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत. यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने देखील दंड ठोठावला होता, यानंतर आता ही नवीन कारवाई झाल्याने कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ML/KA/PGB 10 Jan 2024