शिवगर्जना ढोलताशा पथकाला अयोध्येत राममंदिर परिसरात वादनाचा मान

नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी अनेकांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राण प्रतिष्ठा होणार असून संपूर्ण भारतातून व्ही आय पी सह अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अनेकांना निमंत्रित करण्यात आले असून नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला देखील आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल आहे.
श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या तर्फे ट्रस्ट चे महासचिव चंपत राय यांनी ट्रस्टतर्फे हे निमंत्रण दिले आहे. 24 आणि 25 जानेवारी रोजी नागपूर येथील शिवगर्जना ढोल ताशा पथक आपल्या 111 सहकाऱ्यांसोबत अयोध्या येथे राम मंदिर परिसर, हनुमान गडी आणि अन्य प्रमुख स्थानांवर ढोल ताशा पथक सादरीकरण करणार आहेत.
अयोध्येत रामलल्ला मंदिर परिसरात वादन करतांना रामधून वादनाची खास तयारी पथका कडून करण्यात आलेली आहे. सध्या या पथकाचा सराव जोरात सुरू आहे. यासाठी त्यांची तयारी देखील सुरू केली असून विशेष धून देखील त्यांनी तयार केलेली आहे. अयोध्या येथे आपली कला सादर होणार असल्याने कलाकारांमध्ये देखील आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
ML/KA/SL
9 Jan. 2024