देशी क्रिकेट- धोतर नेसून संस्कृत कॉमेंट्रीसह रंगला अनोखा सामना

 देशी क्रिकेट- धोतर नेसून संस्कृत कॉमेंट्रीसह रंगला अनोखा सामना

भोपाळ, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या नसानसात भिनलेला आहे. इंग्रजांनी आपल्या टाईमपाससाठी सुरु केलेल्या या खेळाला भारतीयांनी आपला धर्मच मानला आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनता क्रिकेटची फॅन आहे असे म्हटल्या वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे सर्व वयोगटांतील, समाजगटांतील आणि आर्थिकस्तरांतील भारतीय क्रिकेटचे फँन आहेत.कोणत्याही विदेशी गोष्टीचा देशी जुगाड करणे हा देखील आपल्याकडे छंद मानला जातो. अशा या साहेबांच्या क्रिकेटचा देशी जुगाड नुकताच मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पहायला मिळाला. ज्यामध्ये काही लोक धोतर नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तसेच या सामन्याची संस्कृतमध्ये कॉमेंट्रीही केली जात आहे.हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आहे. येथे महर्षी फ्रेंडशिप क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती बचाव मंच नावाच्या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेत खेळाडू धोतर आणि कुर्ता घालुन क्रिकेट खेळत आहेत. इतकेच नव्हे तर या सामन्याची संस्कृतमध्ये कॉमेंट्री केली जात आहे. याच कारणामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला खास बक्षीस दिले जाणार आहे. विजेत्या संघाला संस्कृती बचाव मंचतर्फे अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी नेले जाणार आहे. त्यामुळे सर्व संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.

ANI ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. दरम्यान, याआधीही क्रिकेटचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये काही खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले होते. मात्र धोतर नेसून क्रिकेट खेळण्याचा अनोखा प्रकार पहिल्यांदाच अ मैदानावर पहायला मिळात आहे.

SL/KA/SL

6 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *