मुंबई प्रदूषणमुक्त होणार कशी?

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेचा पर्यावरण विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र पालिकेच्या पर्यावरण विभागाची भिस्त एकाच अधिकाऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.
पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे एकच लिपिक आहे, तर उर्वरित कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभागातील आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वाहून घेतलेल्या पर्यावरण विभागाच्या कामाचा बोजवारा उडाला तर मुंबई प्रदूषणमुक्त कशी होईल, अशी चिंता यातून निर्माण झाली आहे. या चिंतेला उत्तर म्हणून पर्यावरण विभागात सुमारे 40 नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
पर्यावरण विभागात मनुष्यबळाची कमतरता असून, किमान प्रत्येक वाॅर्डात एक तरी सब इंजिनिअर द्या, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे पर्यावरण विभागाने पाठविला आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बांधकामाच्या ठिकाणी नियमावली जारी केली आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत; मात्र पर्यावरण विभागातच मनुष्यबळ कमी असल्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय करावे? असा प्रश्न आता पर्यावरण विभागाला सतावत आहे.
2005 मध्ये महापालिकेत पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त स्थापन करण्यात आले. 2016 पूर्वी पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग दोन्ही एकाच उपायुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यरत होते. मात्र 2016 मध्ये या विभागांच्या विभाजनानंतर स्वतंत्र उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली. असे असले तरी दोन्ही विभागातील एकाही कर्मचाऱ्याची पर्यावरण विभागात बदली झाली नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. Environment department is suffocating, how will Mumbai be pollution free?
ML/KA/PGB
6 Jan 2024