चंद्रपुरात भरड धान्याची झाली विश्वविक्रमी खिचडी ……..

 चंद्रपुरात भरड धान्याची झाली विश्वविक्रमी खिचडी ……..

चंद्रपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कृषी महोत्सव 2024 मध्ये विश्वविक्रमी मिलेट्स खिचडी बनविण्याचा संकल्प केला होता , त्यानुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या उपक्रमाने विश्वविक्रमाला आज गवसणी घातली गेली. चंद्रपूरकर नागरिकांनीही या पौष्टिक खिचडीचा स्वाद घेण्यासाठी लावली मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

चंद्रपुरात भरड धान्याची विश्वविक्रमी खिचडी अखेर झाली. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कृषी महोत्सव 2024 मध्ये विश्वविक्रमी मिलेट्स खिचडी बनविण्याचा संकल्प केला होता. महाकाय कढईत भरभक्कम साहित्यासह सकाळी सहा वाजेपासून स्वतः शेफ विष्णू मनोहर ही खिचडी करत होते. यासाठी चंद्रपूरच्या कृषी विभागाच्या आत्मा आयोजन समितीने त्यांना सहकार्य केले. याआधी विविध विश्वविक्रम करणाऱ्या विष्णू मनोहर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर ही भरड धान्याची पौष्टिक खिचडी बनवण्याचे ठरविले होते.
तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर ही खिचडी अखेर पूर्ण झाली आहे.चंद्रपूर शहराच्या हद्दीतील शाळांमध्ये ही मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी पोहोचविली गेली आहे. चंद्रपूरकर नागरिकांनीही या पौष्टिक खिचडीचा स्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.World record khichdi made of coarse grain in Chandrapur ……..

ML/KA/PGB
5 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *