रायगड जिल्ह्यातील या समुद्र किनाऱ्यावर होणार टेंट सिटी

 रायगड जिल्ह्यातील या समुद्र किनाऱ्यावर होणार टेंट सिटी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याला नितांत सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांच वरदान लाभलं आहे. त्यामुळेच अलिबाग आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर वर्षभर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. पर्यटनाला चालना देण्यासाठी MTDC द्वारे विविध योजनाही राबवल्या जातात.पर्यटकांचा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) राज्यातील पहिली टेंट सिटी उभारण्यासाठी मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या रायगडमधील किहीम बीचची निवड केली आहे. किहीम बीचवर टेंट सिटी तयार करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. येत्या 15 दिवसांत सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर मार्च ते एप्रिलपर्यंत ही टेंट सिटी पर्यटकांसाठी तयार होईल. टेंट सिटीमध्ये राहण्याची पर्यटकांची क्रेझ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

एमटीडीसीच्या एमडी श्रद्धा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार किहीम बीचवर टेंट सिटी तयार करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. येत्या 15 दिवसांत सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर मार्च ते एप्रिलपर्यंत ही टेंट सिटी पर्यटकांसाठी तयार होईल असेही त्यांनी साांगितले. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीकडून नवनवीन प्रयोग केले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून या टेंट सिटीची उभारणी केली जाणार आहे. टेंट सिटीमध्ये राहण्याची पर्यटकांची क्रेझ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.टेंट सिटी तयार झाल्यानंतर दिवसभर समुद्राचा आनंद लुटल्यानंतर पर्यटकांना रात्री मुक्काम करून टेंट सिटीचाही आनंद घेता येणार आहे. मुंबई ते अलिबाग दरम्यान बोटीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच पर्यटकांना रस्ता मार्गे आपल्या वाहनाने देखील अलिबागला जाता येते. पर्यटकांना त्यांच्या वाहनासह अलिबागला पोहोचवण्यासाठी रोपेक्सची सुविधाही उपलब्ध आहे.

या टेंट सिटीमध्ये तंबूनगरीत पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्याबरोबरच खाण्यापिण्याच्या सुविधेसह इनडोअर आणि आउटडोअर खेळांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पर्यटनाला प्रचंड वाव आहे. मात्र अनेक निर्बंधांमुळे प्रत्येक ठिकाणी बांधकामे करता येत नाहीत. अशा ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी टेंट सिटी हा उत्तम पर्याय आहे. कारण शहराला तयार करण्यासाठी जास्त बांधकाम करण्याची गरज नाही. यामुळे पर्यावरणाची काळजी घेत कमी खर्चात प्रकल्प सहज पूर्ण करता येईल.मुंबई आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना आता टेंट सिटीचा आनंद घेण्यासाठी लेह, लडाख, गुजरात किंवा राजस्थानला जाण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांना शहराजवळ टेंट सिटी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किहीम बीचची टेंट सिटी उभारण्याचा उपक्रम लवकरच सुरु होणार आहे.

SL/KA/SL

5 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *