या देशांच्या ताब्यात आहे जगातील सर्वांत जास्त क्रिप्टो करन्सी
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या डिजिटल जगात क्रिप्टो करन्सीने गुंतवणूकदारांना चांगलीच भुरळ घातली आहे. कोरोनाच्या काळात डिजिटल करन्सीचा ट्रेंड झपाट्याने वाढला. जगात लोकसंख्येच्या दृष्टीने भारतीयांकडे सर्वाधिक क्रिप्टोकरन्सी आहेत. भारतात 7.23 टक्के म्हणजेच सुमारे 10 कोटी लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे. पण टक्केवारीच्या दृष्टीने पाहिले तर जगातील अनेक देश भारताच्या पुढे आहेत.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, युएई (UAE) मधील लोकांकडे जगात सर्वाधिक क्रिप्टोकरन्सी आहे. या देशातील 27.67 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे. या यादीत व्हिएतनाम दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात 20.54 टक्के लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे. सौदी अरेबियात 17.53 टक्के, इराणमध्ये 13.46 टक्के आणि अमेरिकेत 13.22 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे.
भारतात 7.23 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे. तर पाकिस्तानमधील 6.4 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये 10.30 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे. व्हेनेझुएलामध्ये महागाईचा दर जगात सर्वाधिक आहे. तर या देशात पेट्रोलचे दर सर्वात कमी आहेत. या देशातील 10.30 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे. या यादीत पुढचे नाव दक्षिण आफ्रिकेचे आहे. या देशातील 10 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे. थायलंडमध्ये 9.32 टक्के लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहेत. या यादीत भारत दहाव्या स्थानावर आहे.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो-चलन, किंवा क्रिप्टो हे एक डिजिटल चलन आहे जे संगणक नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही.
SL/KA/SL
5 Jan. 2024