सत्यशोधक’ चित्रपट होणार करमुक्त ?

 सत्यशोधक’ चित्रपट होणार करमुक्त ?

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट उद्या (दि. ५) प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला आहे. या खास शोला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली होती. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ यांनी त्याचं कौतुक केलं. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ‘सत्यशोधक’ या चित्रपटातून क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. तसेच, महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ‘सत्यशोधक’ हा चित्रपट महाराष्ट्र शासनाच्यावतीने लवकरच कर मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘महात्मा फुले यांच्या विचारांची उत्तम मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य बघता एका चित्रपटातून त्यांचे विचार मांडता येऊ शकत नाहीत. त्यांच्या आयुष्यावर आधारित आणि त्यांचे वेगवेगळे विचार मांडणारे काही चित्रपट अजून बनायला हवेत. या चित्रपटातून देखील महात्मा फुले यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे काम होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून पाहायला हवा.’

अभिनेते संदीप कुलकर्णी हे या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका करणार आहेत. या चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.मात्र भुजबळांनी केलेल्या घोषणेमुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SL/KA/SL

4 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *