झणझणीत मिसळ

 झणझणीत मिसळ

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मटकी एका भांड्यात घालून, धूवून, थोडं मीठ + हळद + थोडं पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या + ५ मिनिटं कमी आचेवर अशी तयार करून घ्यावी.
कटाकरता दोन भांडी लागतील. मसाला भाजायला लोखंडी कढई आणि कट करायला जरा जाड बुडाचं पातेलं. तर लोखंडी कढई दणकून तापू द्यावी, तोवर कांदा उभा (जरा जाडसर सुद्धा चालेल) चिरून घ्यावा. तोवर कढई तापली असेल तर त्यात नुसता कांदा घालून परतायला घ्यावं आणि आच मंद करावी. पहिले ५/७ मिनिटं कांदा तेल न घालताच परतायचाय.
यावर आता एक चमचाभर तेल सोडून पुढे परतत राहायचं. चांगला खमंग लालसर झालाकी काढून गार करत ठेवावा. त्याच कढईत सुकं खोबरं कोरडंच किसाच्या कडा लालसर होइस्तो मंद आचेवर परतून तेही गार करत ठेवलेल्या कांद्यावर घालून दोन्ही थंड होऊ द्यावं.
कांदा खोबरं बर्‍यापैकी गार झाल्यावर, त्यातच आलं आणि लसूण घालून मिक्सरमधून गंधगोळी वाटून घ्यावं. हे वाटपाचं बदगं वाटीभर तरी व्हायला हवं.
आता दुसर्‍या जाड बुडाच्या पातेल्यात दीड वाटी तेल तापत घालावं आणि ते तापल्यावर मोहोरी घालून तडतडू द्यावी. वर हे वाटण घालून परतायला घ्यावं. आच मंदच हवी.
परततांना आधी सगळ तेल गायब होतं आणि जसजसा मसाला होत येइल तसतसं तेल सुटायला लागतं.
या मसाल्याला तेल चांगलं सुटलं की यात ५-६ चमचे लाल तिखट, पाऊण चमचा हळद, मिसळ मसाल्याच्या पाकिटातला मसाला, मीठ, चिमटीभर साखर असं सगळ घालून अजून २-३ मिनिटं पुढे परतायचंय. या स्टेपला मसाला भांड्याच्या तळाला लागतोय असं वाटलं तर जरा पाण्याचा हबका देता येइल.
मसाला खमंग भाजला, नाकात दम आला आणि सुवास घरभर उधळला की ५-६ कप पाणी यात घालून उकळी येऊ द्यावी. एकदा दणकून उकळलं की आच मंद करून अजून १० मिनिटं तरी कट उकळू द्यावा. नंतर आच बंद करून झाकण घालून १० मिनिटं मुरू द्यावा.
आगदी वाढतेवेळी वरून थोडी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चांगला लालभडक तवंग असलेला कट गरम गरम असतांनाच खायला घ्यावा. Misal at home

ML/ML/PGB 10 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *