राज्यभर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा…
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या पुरवठादार आणि वाहतूकदार संघटनेने पुकारलेल्या संपाचा परिणाम कालपासून राज्यभर जाणवू लागला असून जवळपास सर्व पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
पेट्रोल, डिझेल नसल्याने अनेक शहरातील पेट्रोल सकाळपासूनच बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर पेट्रोलपंपावर वाहन चालकांनी धाव घेतल्याने तेथे वाहनांच्या रांगा दिसून आल्या. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप धारकांकडे स्वतःचे वाहन असल्याने त्या पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे. त्या ठिकाणी वाहन चालक आपल्या गाड्यांच्या टाक्या फुल करताना दिसत होते.
सोमवारी पेट्रोल पुरवठा करणाऱ्या वाहतूकदार संघटनेने संप पुकारल्याने मंगळवारी सकाळीच अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्याचे दिसून आले. बंद केलेल्या पेट्रोल पंपावर ओन्ली डिझेल असे बोर्ड लावण्यात आले होते. तसेच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल नसल्याचे सांगताना दिसून आले.
जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे, तोपर्यंत पंप सुरू राहतील. त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील असाचा सूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसून आला. मात्र पेट्रोल आणि डिझेल डीलर्स ने संप पुकारला नसून आमचा पुरवठा सुरू आहे, काही ठिकाणी आम्हाला अटकाव होत असल्याने ही स्थिती झाली असे डीलर्स संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून गरज पडल्यास पेट्रोल पंप धारकांना पोलीस संरक्षण देण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे.Queues of vehicles at petrol pumps across the state
ML/KA/PGB
2 Jan 2024