सुरती पनीर घोटाला

 सुरती पनीर घोटाला

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पनीर – २00 ग्रॅम ग्रेट करून
३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
भोपळी मिरची (मध्यम) – २ बारीक चिरून
३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करून
पावभाजी मसाला – १ १/२ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट – १ टे स्पून
गरम मसाला – १ टी स्पून
कसुरी मेथी – १ टे स्पून
टोमॅटो केचप – २ टे स्पून
धणे जिरे पावडर – १ टे स्पून
बटर – १ टे स्पून
तेल – फोडणीसाठी अंदाजानुसार
पाणी – एक ते दीड वाटी (आमटीची वाटी)
हिन्ग, हळद, मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

कढईत तेल घ्या. तेल तापले की त्यात हिन्ग, हळद व बारीक चिरलेला टोमॅटो आणि भोपळी मिरची टाका. २ मिनिटानंतर त्यात सगळे मसाले टाका, बटर टाका आणि मीठ टाका. तेल सुटू लागले की त्यात पनीर टाका. नन्तर पाणी टाका. एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाका. २ मिनिटे वाफ काढा. Surti Paneer Scam

हा घोटाला मसाला पाव बरोबर मस्त लागतो. त्यासाठी लादी पाव घ्यावा. तव्यावर बटर टाका, बटर वितळले की त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाका. पाव मधून कापून ह्या मिश्रणावर दोन्ही साईडने शेकून घ्या.

PGB/ML/PGB
25 Sep 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *