औद्योगिक वसाहतीतील अग्नितांडवात सहा कामगारांचा मृत्यू

 औद्योगिक वसाहतीतील अग्नितांडवात सहा कामगारांचा मृत्यू

छ. संभाजीनगर, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मधील सनशाइन एंटरप्राइजेस कंपनीत आज मध्यरात्री झालेल्या अग्नि तांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अग्नी तांडवात मृत झालेल्या कामगारांची नावे मुश्ताक शेख, कौसर शेख, इकबाल शेख, रियाज भाई, मशगुल शेख अशी आहेत.
बिहार राज्यातील हे कामगार आहेत.

शनिवारी रात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत आग भडकतच होती. सनशाईन इंटरप्राईजेस या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम केले जाते. पंधरा कामगारांसह एक महिला , दोन लहान मुले असे एकूण १८ जण येथे काम करतात या कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील आहेत. हे सर्व कामगार कंपनीतच राहत होते. रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास अचानक या कंपनीला आग लागली त्यावेळी सर्वजण झोपलेले होते.

धूर, आगीच्या झळा लागल्यानंतर काही कामगार झोपेतून उठले त्यांनी कंपनीच्या वरच्या भागातून उड्या मारल्या मात्र पाहता पाहता आग भडकल्याने सहा कामगार आतमध्येच अडकून त्यांचा मृत्यू झाला. तब्बल साडेतीन तास हे अग्नीतांडव सुरु होते, सहा अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग नियंत्रण आणण्यात आली. याबाबतीत पुढील तपास वाळुज पोलिस स्थानक करत आहे.

ML/KA/SL

31 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *