सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आयटी मंत्रालयाकडून कठोर निर्देश

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
सध्या देशभरात बनावट कर्ज देणाऱ्या फ्रॉड Apps च्या जाळ्यात सर्वसामान्य नागरिक फसत चालले आहेत. या प्रकारांना ताबडतोब पायबंद घालण्यासाठी आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मिडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही फ्रॉड लोन अॅप्सची जाहिरात दाखवू नका असे आदेश दिले आहेत.
भारतात फ्रॉड लोन अॅप्सचं या माध्यमातून लोकांचा मानसिक छळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात सक्रीय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना (समाज माध्यमांना) इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने कठोर आदेश दिले आहेत.
एखाद्या ठिकाणी घोटाळा झाला, फसवणुकीचं प्रकरण समोर आलं तर संबंधित फ्रॉड अॅपसह त्या अॅपची जाहिरात प्रसिद्ध करणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही जबाबदार असेल, असं आयटी मंत्रालयाने म्हटलं आहे. पुढच्या सात दिवसांच्या आत यासंबंधीची कार्यवाही करा, असे आदेश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा कंपनीच्या फेसबूक, इन्स्टाग्राम आणि गुगलसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना दिले आहेत.
SL/KA/SL
27 Dec. 2023