जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील यांचे निधन
सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकनेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार प्रा.शरद पाटील यांचे आज बुधवार पहाटे ६.०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा.पाटील हे १९९० आणि १९९५ अशा दोनवेळा कुपवाड – मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
२००२ ते २००८ मध्ये भाजपचे प्रकाश जावडेकर यांचा पुणे पदवीधर मतदार संघात पराभव करून विधान परिषदेवर निवडून गेले होते. प्रा. पाटील यांनी तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेत उत्तम काम केले होते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे आणि स्वतः कधीच चुकीचे काम न करणारे चारित्र्यसंपन्न लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या जाण्याने जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नुकसान झाले आहे. प्रा. शरद पाटील हे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे विश्वासू होते.
ML/KA/PGB 27 Dec 2023