मुंबई ते अयोध्या थेट विमानसेवा होणार सुरू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील रामभक्त उत्सुक आहे. यासाठी सरकारने विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आता हा प्रवास जलदगतीने करू इच्छिणाऱ्यांसाठी एक विशेष बातमी आहे.
आता मुंबई ते अयोध्या अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा इंडिगोने (Indigo) केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक सुखकर होणार आहे. या आधी दिल्ली ते अयोध्या अशी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतूनही ६ जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
अयोध्येत विमानतळ झाल्यानंतर विमान वाहतूक कंपन्या अयोध्येसाठी फ्लाईट सुरु करत आहेत. सर्वात प्रथम ‘इंडिगो’ने दिल्ली ते अयोध्या ही फ्लाईट सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुंबईतून अयोध्येला जाण्यासाठी मार्ग सुखकर होणार आहे. विमान वाहतूक कंपनी ‘इंडिगो’ 30 डिसेंबर पासून दिल्लीतून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करत आहे.
‘अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळा’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘इंडिगो’ने (Indigo) दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्येतून दिल्ली आणि अहमदाबादसाठी फ्लाईट सुरु होणार आहेत. इंडिगो ही कंपनी अयोध्येतून व्यावसायिक दृष्ट्या 6 जानेवारीपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करणार आहे. पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
SL/KA/SL
26 Dec. 2023