पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू

मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई (ब. क्र 111615) समीर सुरेश जाधव (वय 37) ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असताना पतंगाच्या मांजाने त्यांचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
सुरेश जाधव हे बिल्डिंग न 77, वरळी बी डी डी चाळ, रूम न 28, वरळी मुंबई येथील रहिवासी असून ते साडेतीन वाजाताचे सुमारास त्यांचे मोटार सायकल वरून कर्तव्य पूर्ण करून वरळी येथील निवासस्थानी जात होते. त्याचवेळी सांताक्रुज (पुर्व )वाकोला ब्रिजवरून जात असताना त्यांचा मांजाने गळा चिरला. खेरवाडी मोबाईल 1 यांनी जाधव यांना तातडीने उपचारकामी सायन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून जाधव यांना मृत घोषित केले.
दरम्यान खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन, मृत सुरेश जाधव यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.अशी माहिती दिंडोशी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांनी दिली.
SW/KA/SL
25 Dec. 2023