पर्यावरण संवर्धन करीत अत्याधुनिक युगात पाऊल ठेवणारी डॅफोडिल्स सोसायटी

 पर्यावरण संवर्धन करीत अत्याधुनिक युगात पाऊल ठेवणारी डॅफोडिल्स सोसायटी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॅफोडिल्स सोसायटीमध्ये दररोज ओला कचरा गोळा केला जातो आणि नंतर त्याचा वापर कंपोस्ट तयार करण्यासाठी केला जातो जो नंतर रहिवाशांमध्ये वितरित केला जातो. सोसायटी आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे आणि सर्व सण शांततेने पारंपारिक पद्धतीने साजरे करतात. मुलांमधील विविध कौशल्ये वाढविण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणपती उत्सवादरम्यान, मातीचा गणपती बनवणे, संगीत, नृत्य, रांगोळी, चित्रकला, संवाद कला अशा विविध उपक्रमांत मुले आपली कला सादर करू शकतात.

पर्यावरण पूरक उपक्रम
१) विजेवर चालणाऱ्या नवीन वाहनांसाठी चार्जिंगची व्यवस्था सोसायटीमध्ये करण्यात आली आहे. यासाठी सोसायटीला कुंदा भिसे यांच्या समाजसेविका संस्थेच्या सौजन्याने ही व्यवस्था मिळाली आहे.
२) सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची सोय आहे.
३) सोसायटीमध्ये वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे संपूर्ण सोसायटी परिसरामध्ये शुद्ध हवा आणि भरपूर हिरवाई नांदत आहे.
४) सोसायटीमध्ये रोज जमा होणारा ओला कचरा प्रत्येक घरातूनच वेगळा केला जातो आणि त्याचे खत बनवले जाते. खत बनवणाऱ्या यंत्राची सोय सोसायटीने स्वखर्चाने उचलली आहे. हे बनणारे खत रहिवासी घरातील फूल झाडांसाठी पोषण म्हणून वापरतात.
५) पूर्ण सोसायटीत सार्वजनिक वीज वापर सौर उर्जेपासून करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी लागणारी प्रकल्प योजना कार्यरत करण्याचीही योजना आखण्यात आली आहे.


सुरक्षा आणि सुव्यवस्था
सोसायटीच्या सुरक्षिततेच्या अंतर्गत काही जाणीवपूर्वक बदल करण्यात आले आहेत. स्वयंचलित बूम बॅरियर, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, अभ्यागतांची सॉफ्टवेअरद्वारे नोंद अशा अनेक योजना कार्यरत आहेत.

नावीन्यपूर्ण उपक्रम
१) कॉमन एरियामधील इमारतींचा विजेचा वापर कमी करण्यासाठी बिल्डिंग लॉबी
२) पायऱ्यांवर ऑटो सेन्सर दिवे
३) टू व्हीलर ईव्ही चार्जिंग स्टेशन
४) सर्व लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
५) इंटरकॉम
६) ज्येष्ठ नागरिकांसाठी आजोबा कट्टा
७) इमारतीच्या दोन्ही पार्किंग व कॉमन एरियामध्ये स्वच्छतेसाठी डस्टबिनची व्यवस्था


सांस्कृतिक कार्यक्रम
सोसायटीत कृष्णा जन्माष्टमी, गणेशोत्सव, गरबा, कोजागरी पौर्णिमा, मकर संक्रांती, होळी,
पर्यावरण दिवस, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यासारख्या कार्यक्रमांमुळे एकमेकांशी जिव्हाळ्याने नाती जोडली गेलेली माणसे पाहायला मिळतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांसाठी सायकलस्पर्धा, लिंबू चमचा, ज्येष्ठांसाठी टेबल टेनिस, महिलांसाठी संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेऊन पारितोषिक दिले जातात.
गणेशोत्सवात अनेक स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी बॅडमिंटन, क्रिकेट, नृत्य, गायन, वाद्य आदी स्पर्धा घेतल्या जातात. स्वातंत्र्यदिनी महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते.

एक मुठ्ठी अनाज
पिंपळे सौदागर उपनगरातील उपक्रमांतर्गत डॅफोडिल्स सोसायटी गेल्या ३० महिन्यांपासून दर महिना दीडशे ते दोनशे किलोंचे धान्य वाटप करते. मुख्यतः सर्व धान्य वंचित, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आश्रमशाळा यांना विनामूल्य देण्यात येते.

‘‘गेली सात ते आठ वर्षामध्ये डॅफोडिल्स सोसायटीला अत्याधुनिक सोसायटी बनवले आहे. ज्यामध्ये मोकळी हवा, जिम, क्रीडा स्पर्धा यासाठी विशेष नियोजन केले आहे. सोसायटीच्या आवारात १०० हून अधिक औषधी झाडे जोपासली आहेत. सोसायटी पर्यावरण संवर्धक आहे.
– राजू शेलार,
अध्यक्ष, डॅफोडिल्स सोसायटी.

‘‘ सोसायटीला अत्याधुनिक बनविण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी एलईडी लाइट, मंदिर व मुख्य दरवाजाजवळ सौर ऊर्जा दिवे, ईव्ही चार्जिंग युनिट, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे यंत्र बसविले आहे.
– सुधीर नारायण वाघमारे, सचिव डॅफोडिल्स

Daffodils Society steps into the modern age by protecting the environment

ML/KA/PGB
24 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *