सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर जानेवारीत सुनावणी

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे जरांगे पाटील यांचे आंदोलन तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल, असा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.. त्यामुळे मराठा आरक्षणाचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मनोज जरांगे पाटील आता काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याचिकाकर्ते विनोद पाटील काय म्हणाले…!
माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटी पिटीशन स्वीकारलेली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले. 12 वाजून 23 मिनिटाला याबाबत माननीय न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मला विश्वास आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे, असा दावा विनोद पाटील यांनी केला.
मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. तसेच येत्या 24 जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
SL/KA/SL
23 Dec. 2023