हा कुस्तीपटू परत करणार पद्मश्री पुरस्कार
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर नंतर निषेध व्यक्त करत काल कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पूनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिताना त्याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
या पत्रात पूनियाने म्हटले आहे की, बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अॅम्बेसेडर बनणाऱ्या मुलींना अशा परिस्थितीत टाकण्यात आले की, त्यांना त्यांच्या खेळापासून मागे हटावे लागले. आम्ही “आदरणीय” पैलवान काही करू शकलो नाही. महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर मी माझे आयुष्य “सन्माननीय” म्हणून जगू शकणार नाही. असे जीवन मला आयुष्यभर त्रास देईल. म्हणूनच हा “सन्मान” मी तुम्हाला परत करत आहे.
संजय हे महासंघाचे माजी अध्यक्ष बृज भूषण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. ज्यांच्याविरुद्ध कुस्तीपटू आंदोलन करत होते त्यांचे निकटवर्तीय महासंघाच्या अध्यक्ष झाल्याने खेळाडू नाराज झाले. साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर जानेवारी महिन्यात बजरंग, साक्षी आणि विनेश फोगाट यांनी बृज भूषण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले होते.
बजरंग पूनियाला २०१९ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बजरंगला हा पुरस्कार दिला होता. त्याच वर्षी बजरंगला खेल रत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देखील मिळाला होता. २९ वर्षीय बजरंग हा भारताच्या यशस्वी कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४, आशियाई स्पर्धेत २, राष्ट्रकुल स्पर्धेत ३ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ८ पदके जिंकली आहेत.
SL/KA/SL
22 Dec. 2023