LIC च्या शेअरने घेतली उसळी

 LIC च्या शेअरने घेतली उसळी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून गुंतवणूकदारांना काहीसा निराश करणाऱ्या LIC च्या शेअरने आता जोरदार उसळी घेतली आहे.आज या शेअरच्या भावात ३.७३ टक्क्यांची वाढ झाली असून सध्या तो ७९३ रुपयांवर ट्रेड करत आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाचा हा परिणाम मानला जात आहे.

एलआयसीचा शेअर काल ७६४.५५ रुपयांवर बंद झाला होता. सरकारच्या निर्णयानंतर आज या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. सकाळच्या सत्रात हा शेअर थेट ८१३ रुपयांवर गेला. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यातील हा उच्चांक आहे. सध्या हा शेअर ७९३ रुपयांवर ट्रेड करत आहे. एलआयसीचे बाजार भांडवल ५ लाख कोटींच्या पुढं गेलं आहे.

एलआयसीचा शेअर १७ मे २०२२ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. एलआयसीच्या आयपीओसाठी ९०२ ते ९४९ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. बीएसईवर (BSE) हा शेअर ८६७.२० तर, राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) ८७२ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. गुंतवणूकदारांनाच याचा मोठा धक्का बसला होता.

मात्र गेल्या महिनाभरापासून पुन्हा एकदा LIC चा शेअर चढत्या क्रमानं मार्गक्रमण करत आहे. मागच्या सहा महिन्यांत एलआयसीचा शेअर पुन्हा वाढत आहे. मागच्या महिनाभरात त्यात तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, दोन महिन्यात हा शेअर ३५ टक्क्यांनी वाढला आहे.

SL/KA/SL

22 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *