सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश- मुग्धाचा विवाह सोहळा संपन्न

 सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश- मुग्धाचा विवाह सोहळा संपन्न

चिपळूण, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय नवोदित युवा गायक कलाकार प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला. सारेगमप लिटील चॅम्पमध्ये मोदक आणि मॉनिटर म्हणून प्रतिस्पर्धी असलेले प्रथमेश आणि मुग्धा आज जीवनसाथी झाले आहेत. या दोन्ही कलाकारांचे राज्यभर लाखो फॅन्स आहेत. या फॅन्सनी नवदांपत्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला त्यांच्या मित्रपरिवाराने खास हजेरी लावत या लग्नसोहळ्याला आणखी रंगत आणली. गायक रोहित राऊत, गायिका शमिका भिडे, जुईली जोगळेकर यांनी मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला खास हजेरी लावली. त्याचबरोबर गायिका व मुग्धाची खास मैत्रीण कार्तिकी गायकवाडनेही या लग्नाला खास हजेरी लावली होती. कार्तिकी तिच्या कुटुंबियांसह मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. नवरा, भाऊ व वडील यांच्यासह कार्तिकी या लग्नाला आली होती. कार्तिकी, मुग्धा व प्रथमेश हे सारेगमप या कार्यक्रमापासून एकमेकांबरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ही मैत्रीदेखील खास आहे.

लग्नात मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान नेसली होती तर प्रथमेशने लाल रंगाचा धोतर, सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचा शेला व डोक्यावर पगडी असलेला पेशवाई लूक केला होता.

SL/KA/SL

21 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *