ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटूने जाहीर केली निवृत्ती
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत संजय सिंग यांनी बाजी मारली आहे. हा निकाल समोर येताच कुस्तीपटू साक्षी मलिकला रडू कोसळलं. निवडणूकीच्या निकालानंतर ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
ती म्हणाली की,’आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातील अनेक भागातून लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी आले. यात वृ्द्ध महिलांचाही समावेश होता. आमच्याकडे असेही लोकं आली ज्यांच्यांकडे खायला आणि कमवायला काहीच नाही. आम्ही जिंकू शकलो नाही,मात्र सर्वांचे आभार.’
साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा करताच, विनेश फोगट भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ती म्हणाली की,’ हे खूप दुख:द आहे. आम्ही लढलो, मात्र जिंकू शकलो नाही. मला माहित नाही की आम्हाला न्याय कसा मिळेल. आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मी युवा खेळाडूंना इतकच सांगेल की,अन्यायाचा सामना करण्यासाठी तयार राहा. कुस्तीचं भविष्य अंधारात आहे,तरी मी आशा करते की, आम्हाला न्याय मिळेल. आम्ही आमचं दु:ख कोणाला सांगाव? आमचा लढा अजुनही सुरुच आहे.
ML/KA/SL
21 Dec, 2023