भंगार विक्रीतून रेल्वेने कमावले तब्बल २४८ कोटी रुपये

 भंगार विक्रीतून रेल्वेने कमावले तब्बल २४८ कोटी रुपये

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

मुंबई :

देशातील सर्वांत मोठा सरकारी उद्योग असलेली भारतीय रेल्वे विविध उपक्रमांतून विक्रम प्रस्थापित करत असते.मध्य रेल्वेने एक वेगळा विक्रम केला आहे. रेल्वेने सध्या शून्य भंगार उपक्रमाला गती दिली आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्थानक आणि परिसरातील रेल्वेचे भंगार साहित्य विक्रीसाठी काढले आहे. या उपक्रमामध्ये भंगार विक्रीत 34.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फक्त भंगार विक्रीतून तब्बल 248 कोटी रुपये कमावले आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील भंगार विक्रीतील ही सर्वाधिक वाढ आहे. मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2023 पर्यंत तब्बल 18, 229 दशलक्ष टन भांगराची विक्री करून 248 कोटी कमावले आहेत.

वयोमर्यादा पूर्ण झालेले रेल्वे इंजीन, अतिरिक्त डिझेल इंजीन, वापरात नसलेले रेल्वेरूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघातग्रस्त डब्यांसह इंजीन यासह विविध प्रकारचे भंगाराचे वर्गीकरण करीत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेने पाऊल उचलले आहे. त्यामुळेच भंगार विक्रीतून हे 300 कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या उद्दिष्टाच्या 82 टक्के उद्दिष्ट नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण झालेले आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील भंगार विक्रीतील ही सर्वाधिक वाढ आहे. मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2023 पर्यंत तब्बल 18, 229 दशलक्ष टन भांगराची विक्री करून 248 कोटी कमावले आहेत.

रेल्वेने विक्री केलेल्या भंगारातून भुसावळ विभागाला सर्वांधिक 49 कोटी 20 लाख तर त्यानंतर माटुंगा आगाराला 40 कोटी 58 लाख रु मिळेल आहेत.

SL/KA/SL

20 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *