IPL 2024 साठी च्या लिलावात हा ठरला सर्वात महागडा खेळाडू

 IPL 2024 साठी च्या लिलावात हा ठरला सर्वात महागडा खेळाडू

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात एकीकडे महागाईवर चर्चा सुरु असताना दुसरीकडे मात्र IPL 2024 साठी संघ निवडीसाठी देशविदेशातील खेळाडूंवर करोडोंची उधळण सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क हा 24.75 कोटी रुपयांमध्ये आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर त्या खालेखाल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला लिलावात 20.50 कोटी रुपये मिळाले आहेत. या दोन्ही खेळाडूंना कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले आहे.

मिचेल स्टार्कसाठी प्रथम दिल्ली आणि मुंबई यांच्यात स्पर्धा सुरू झाले. दोन्ही संघ थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्टार्कला अखेर मुंबई इंडियन्स 7.20 कोटींना विकत घेणार होते पण दिल्ली पुन्हा बोलीत आली. कोलकाताने आता 9.60 कोटी रुपयांवर उडी घेतली. मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्स बोलीत आले. दोन्ही संघांकडे सुमारे 31 कोटी रुपये होते आणि लवकरच बोली 20 कोटी रुपयांच्या पुढे गेली.

त्यानंतर स्टार्कने पॅट कमिन्सची 20.5 कोटी रुपयांची बोली मागे पडली. दोघेही हार मानायला तयार नव्हते. गुजरात टायटन्स आक्रमक असताना केकेआर विचारपूर्वक बोली लावत होता. मात्र 24.75 कोटी रुपये गेल्यानंतर गुजरात टायटन्सने माघार घेतली. अशाप्रकारे मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून केकेआरचा भाग बनला.

दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना खरेदी केले. याशिवाय दुबईत आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने भारतीय मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलला 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

SL/KA/SL

19 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *