जुन्या इमारतींसाठी आता नवीन तज्ज्ञांची समिती

नागपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील जुन्या इमारतींची तपासणी करून तिला मालकांच्या संगनमताने धोकादायक करण्याच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ञ व्यक्ती नेमण्याची कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
याबाबतचा प्रश्न मंगेश कुडाळकर यांनी उपस्थित केला होता, त्यावर अमीन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, रवींद्र वायकर आदींनी उप प्रश्न विचारले होते. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी समिती मध्ये आयआयटी , व्ही जे टी आय मधील तज्ञ व्यक्ती नेमण्याची सूचना केली होती.
याशिवाय मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करण्याची सूचना अध्यक्षांनी सरकारला केली त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल असं स्पष्ट केलं.
राज्यातील बस स्थानके आता सुसज्ज
राज्यातील १९३ बस स्थानकाच्या परिसर काँक्रीटीकरण , रंगरंगोटी करून त्याचा चेहरा मोहरा बदलला जाईल , शिवाय खासगी सहभागातून ही १४० स्थानकांच्या विकासासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
हा मूळ प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता, त्यावर अमित देशमुख , मनिषा चौधरी, नितेश राणे आदींनी उप प्रश्न विचारले होते. सध्या ७२ स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आलं आहे, ७० स्थानकांची प्रगती पथावर आहेत, ४०२ कोटी रुपयांचा निधी देऊन ९० स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.
एमआयडीसी शी सामंजस्य करार करण्यास आला असून १९३ स्थानकांच्या परिसराचं काँक्रीटीकरण आणि दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात येणार आहे असं मंत्री भुसे म्हणाले.
ML/KA/SL
19 Dec. 2023