पालघर – बोईसर रेल्वे स्थानकादरम्यान दोन दिवस मेगा ब्लॉक

 पालघर – बोईसर रेल्वे स्थानकादरम्यान दोन दिवस मेगा ब्लॉक

पालघर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्र्चिम रेल्वेच्या पालघर – बोईसर रेल्वे स्थानका दरम्यान १६ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस काही तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पालघर – उमरोली दरम्यान जुना ब्रिज तोड़ण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा दोन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

१६ आणि १७ डिसेंबर ला पालघर – बोईसर रेल्वे स्थानका दरम्यान अप आणि डाउन लाईनवर ला सकाळी १० वाजता पासून ते दुपारी १२ वाजे पर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान पालघर ला ९.३२ ला येणारी चर्चगेट-डहाणू लोकल, १०.४० पालघर ला येणारी चर्चगेट- डहाणू लोकल, ११.३७ ला पालघर ला येणारी बोरीवली – डहाणू लोकल या लोकल ट्रेन पालघर रेल्वे स्थानका पर्यंतच धावतील.

तर पालघर ला १०.१० ला येणारी डहाणू – विरार लोकल, १०.४५ ला येणारी डहाणू – विरार लोकल, १२.१० ला येणारी डहाणू – विरार लोकल या काही लोकल ट्रेन पालघर रेल्वे स्थानकातून विरार साठी सुटतील. तर बांद्रा – वापी पसेंजर आणि वापी- विरार शटल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर बऱ्याच एक्सप्रेस गाड्या या उशिराने धावण्याची शक्यता आहे.

ML/KA/SL

16 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *