ही आहेत २०२३ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मराठी गाणी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीमध्ये सध्या तरुणाईला आवडतील अशी अनेक गाणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हिंदी गाण्यांकडे वळणारी तरुणाई पुन्हा मराठी गाण्यांकडे वळली आहे. Wynk हे भारतातील संगीतप्रेमींचे आवडते ॲप आहे. या म्युझिक स्ट्रीमिंग ॲपने नुकतेच ‘विंक रिवाइंड 2023 ची घोषणा केली आहे.यात त्यांनी 2023 या वर्षभरातले संगीत क्षेत्रातील अव्वल कलाकार, अल्बम्स तसेच गाण्यांची घोषणा करण्यात आली. ‘
सरला एक कोटी'(Sarla Ek Koti) या चित्रपटातील ‘केवड्याचं पान तू’ हे विंकवरील मोस्ट स्ट्रीम मराठी गाणे (सर्वांधिक ऐकले गेलेले) ठरले आहे. सोनाली सोनावणे विंक म्युझिकवर मराठी भाषेतील मोस्ट स्ट्रीम आर्टिस्ट(Most Streamed Artist) ठरली आहे.
- सर्वांधिक ऐकली गेलेली गाणी आणि गायक- गायिका
- केवड्याचं पान तू – आर्या आंबेकर आणि अजय गोगावले
- नऊवारी – संजू राठोड
- झुमका – संजू राठोड आणि सोनाली सोनावणे
- बहरला हा मधुमास – अजय गोगावले, अजय-अतुल आणि श्रेया घोषाल
- ढगानं आभाळ – जावेदी अली, वैशाली म्हाडे, विनायक पवार, हर्षित अभिराज
- पिरमाची लगन – रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे
- गाऊ नको किस्ना – अजय-अतुल, अजय गोगावले, जयेश खरे, मयुर सुकळे
- बुलेटवाली – जी-स्पार्क, संजू राठोड आणि सोनाली सोनावणे
- दिलावर नाव कोरलयं -राज इरमाळी आणि सोनाली सोनावणे
- आले मराठे आले मराठे – देवदत्त बाजी आणि सुवर्णा राठोड
SL/KA/SL
14 Dec. 2023