राज्यातील पात्र शाळांना या महिन्याचा अखेरीस पर्यंत अनुदान

नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षणाचा दर्जा उंचावावा यासाठी राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता प्राप्त शाळांना टप्याटप्याने अनुदान देण्यात येत असून राज्यातील पात्र 596 कायम विनाअनुदानित शाळांना या महिन्याचा अखेरीस पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अनुदान मंजूर करण्याची कारवाही केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
शिक्षक आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, कपिल पाटील, निरंजन डावखरे रमेश पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. शिक्षकांची भरती प्रवित्र पोर्टलवर येत्या 15 दिवसाचा आत सुरू केली जाईल तसेच 1 वर्षाचा आत राज्यातील सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील असेही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
SL/KA/SL
14 Dec. 2023