२०२७ पर्यंत बेस्ट चा संपूर्ण ताफा हा इलेक्ट्रिकवर

 २०२७ पर्यंत बेस्ट चा संपूर्ण ताफा हा इलेक्ट्रिकवर

नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीकरिता सन २०२७ पर्यंत संपूर्ण बसताफा इलेक्ट्रिक बसगाड्यांचा करण्याचे प्रस्तावित केले असून त्यानुसार बेस्ट उपक्रमामार्फत २१०० एकमजली आणि ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३२०० बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची महिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद सभागृहात दिली.

सद्य:स्थितीत ३५ दुमजली , ४५ एकमजली अशा एकूण ८० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत. अशी माहिती ही सामंत यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुनिल शिंदे, विलास पोतनीस यांनी उपस्थित केली होती. त्यावर सामंत यांनी ही माहिती दिली. 2018-19 मध्ये प्रतिदिन 22 लाख इतकी असलेली प्रवासी संख्या सद्यस्थितीत 33 लाखापर्यंत वाढलेली असून भविष्यात बसगाड्यांचा संख्येत वाढ झाल्यावर प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढण्यासह मुंबईतील प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

SL/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *