राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा

 राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा

जयपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे त्यामुळे वसुंधरा राजे यांचे युग संपल्याचे संकेत भाजपने दिली आहे.
भजनलाल शर्मा जयपूर येथील सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भरतपूर येथे राहणारे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले असले तरीही ते राजस्थान भाजपमधील दिग्गज नेते आहेत. त्यांना अमित शहा यांच्या जवळचे मानले जाते.

भजनलाल शर्मा राजस्थान भाजपचे चार वेळा महामंत्री राहिले असून ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांचे रा.स्व. संघशी जवळचे नाते आहे. त्यांना यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढण्याची संधी मिळाली. राजस्थान भाजपकडून कोणत्या आयोजनात त्यांनी मोठी भूमिका राहिली आहे. त्यांना अमित शहा तसेच जेपी नड्डा यांचे निकटवर्तीय मानले जाते

भजनलाल शर्मा ब्राह्मण समाजातील आहे. ज्यांची राजस्थानमध्ये ७ टक्के लोकसंख्या आहे. मोठ्या कालखंडानंतर राजस्थानला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला आहे.

छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि मध्य प्रदेशमध्ये ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री बनवल्यानंतर भाजपने राजस्थानमध्ये आता ब्राह्मण नेत्याला राज्याच्या प्रमुखपदी बसवले आहे.

SL/KA/SL

12 dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *