खोके सरकार जनतेच्या नजरेतून उतरत चालले आहे

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर खोके सरकार असा उल्लेख करीत समाचार घेतला.
आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी पत्रव्यवहार सरकारकडे करीत असून सरकार त्यांच्या पत्रांकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे.
यातून हे सरकार गोरगरिबांचे सरकार नाही हे सिध्द होत आहे. अश्यातच सत्तेसाठी हपापलेले हे खोके सरकार जनतेच्या नजरेतून उतरत चालले आहे अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी केली होती आणि ती कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली की नाही हे तुम्ही स्वतः बांधावर जाऊन त्यांना विचारा असे आवाहन त्यांनी केले.
काही गोष्टी कायद्याच्या मर्यादेत राहून कराव्या लागतात त्यासाठी आम्ही तयार आहोत. खरोखरच हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते असा टोला ही त्यांनी मारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मुंबईतील समु्द्र किनारे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.या मोहिमे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रक्टर देखील चालवला होता. त्यांच्या या कृतीवर ठाकरेंनी टीका केली .
समुद्रावर ट्रॅक्टर फिरवणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिलाय, अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पत्रक प्रसिद्द करून नवाब मलिकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा सल्ला राष्ट्रवादीला दिला होता. या घडामोडींवर ठाकरे म्हणाले की, ज्या न्यायातून तुम्ही नवाब मलिकांना दुर ठेवले, तोच न्याच प्रफुल्ल पटेल यांना लावणार आहात की नाही? एकाला एक न्याय,दुसऱ्याला एक न्याय, पण लोकांना हा निर्णय ‘पटेल’ का? असा सवाल त्यांनी केला.
ML/KA/SL
11 Dec. 2023