RBI केली UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात दररोज यूपीआय व्यवहारांची संख्या वेगाने वाढत आहे. आरबीआय देशात यूपीआयच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता आरबीआयने युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. RBI ने हॉस्पिटल आणि शाळेच्या UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरणाच्या बैठकीत ही घोषणा केली . तसेच त्यांन रेपो दरात कोणताही बदल केला नसल्याचेही स्पष्ट केले.
RBI च्या नव्या निर्णयानंतर आता UPI च्या मदतीने हॉस्पिटल (Hospital) आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जास्त पेमेंट करता येणार आहे. नवीन धोरणानुसार आता १ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पेमेंट करता येणार आहे. या निर्णयामुळे संस्थांमध्ये यूपीआयच्या वापराला चालना मिळणार आहे. यामुळे रुग्णालयाचे बिल आणि शाळा-कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय कमी होईल.
RBI ने पतधोरणात रेपो दर आणि इतर धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. तसेच कर्जाच्या EMI वर कोणताही दिलासा मिळणार नाहीये. रेपो दरात कोणताही बदल न झाल्यामुळे बँकांना त्याच दरात कर्ज मिळणार आहे.
NPCI नुसार, तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकाल. पेटीएम एका तासात 20,000 रुपयांपर्यंत व्यवहार करु शकते. दर तासाला किमान 5 व्यवहार आणि जास्तीत जास्त 20 व्यवहारांना परवानगी आहे. PhonePe वापरकर्त्यांना एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी देते. त्यामुळे व्यवहार करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
SL/KA/SL
8 Dec. 2023