अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पुत्रावर करचुकवेगिरीचे आरोप

न्यूयॉर्क, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर काल कॅलिफोर्नियात करचुकवेगिरीच्या नऊ आरोपांवर अभियोग दाखल करण्यात आला आहे.
अमेरिकेत अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती बंदूक किंवा अन्य कोणतेही शस्त्र बाळगू शकत नाही. पण आरोपांनुसार अमली पदार्थांच्या अमलाखाली असलेल्या हंटर बायडेन यांच्या बंदूक सापडली. अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या प्रकरणात हंटर दोषी आढळल्यास त्यांना १७ वर्षे तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते, असे विशेष वकील डेव्हिड विस यांनी सांगितले. डेलावरमध्ये २०१८ मध्ये बेकायदा बंदूक खरेदीच्या आरोपांव्यतिरिक्त हंटर यांच्यावर गुंडगिरीचे तीन आणि सहा दुष्कर्माचे आरोप ठेवले आहेत.
SL/KA/SL
8 Dec. 2023