मिचॉन्ग चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील रस्ते जलमय, विमान वाहतूक ठप्प

 मिचॉन्ग चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील रस्ते जलमय, विमान वाहतूक ठप्प

चेन्नई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल दुपारपासून तमिळनाडूच्या किनारपट्टीवर थैमान घालणाऱ्या मिचाँग चक्रीवादळाने राजधानी चेन्नईत हाहाकार निर्माण केला आहे. तामिळनाडूमध्ये मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर आला आहे.

चेन्नई आणि राज्यातील इतर प्रमुख शहरातील मुख्य रस्ते आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. चेन्नईच्या अनेक भागात अनेक वर्षांनी इतका पाऊस झाला. याचा विमानसेवेला देखील सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी चेन्नई विमानतळावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

राज्यभरात सध्या 162 मदत केंद्रे सुरू आहेत, त्यापैकी 43 चेन्नईत आहेत. राज्याच्या राजधानीत कार्यरत 20 स्वयंपाकघरांमधून अन्न पुरवठा केला जात आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी बंद करण्यात आलेल्या चेन्नई विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, विमानतळ कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पावसामुळे 1750 हून अधिक एमएसएमई कंपन्यांना याचा फटका बसला असून 7000 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

SL/KA/SL

5 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *