शब्द विरहित ” भिमांजली ” चे आयोजन

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क,): लेखनात , बोलण्यात , बघण्यात , गाण्यात कुठेही असले तरी शब्द हे कधीकधी वाद निर्माण करतात. असे वाद नको म्हणून गेल्या ७ वर्षा पासून शब्द विरहत सारंगी , व्हायोलिन , बासरी , तबला यांच्या माध्यमातून ” भिमांजली ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . अशी माहिती ताल विहार या संगीत संस्थेचे समन्वयक डॉ. विजय कदम यांनी दिली.
राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता दादर येथे शिवाजी मंदिर नाट्यगृह मधे ” भिमांजली ” हा विनामूल्य कार्यक्रम होत असल्याचे ताल विहार चे अध्यक्ष पंडित मुकेश जाधव यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीताची आवड होती. त्यांच्याकडे फिडल ,व्हायोलिन , तबला ही वाद्य होती. पश्चात संगीत त्यांना आवडत असे. महापरिनिर्वान दिनानिमित्त जगभर होर्डिंग्ज लावले जातात. त्या होर्डिंग्जवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसोबत आपल्या कुणाचाच फोटो त्यांच्या सोबत नको खाली असावा. आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. असे पंडित मुकेश जाधव यांनी सांगितले.
SW/KA/SL
5 Dec. 2023