अदानी समूह पायाभूत सुविधांवर खर्च करणार ७ लाख कोटी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूह पुढील 10 वर्षांत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर $84 अब्ज म्हणजेच सुमारे ₹7 लाख कोटी खर्च करणार आहे. समूहाचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) जुगशिंदर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. सिंह म्हणाले, ‘आमच्याकडे 20 लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, मात्र चांगल्या विक्रेत्यांअभावी एवढी मोठी गुंतवणूक करण्यात अडचणी येत आहेत.’
ते म्हणाले की, आम्ही आमच्या विक्रेत्यांची संख्या वाढवल्याने आमचा भांडवली खर्चही वाढेल. जर आमच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनी चांगली कामगिरी केली तर आम्ही पुढील 25 वर्षांत 80 लाख कोटी रुपये खर्च करू शकू.
अदानी ग्रुपच्या सहा कंपन्या, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स अँड SEZ, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर आणि दोन असूचीबद्ध कंपन्या – अदानी एअरपोर्ट्स आणि अदानी रोड्स लवकरच जागतिक आणि देशांतर्गत बाजारात मोठ्या गुंतवणुकीची योजना आखत आहेत. यासाठी या कंपन्या रोखे जारी करून बाजारातून निधी उभारणार आहेत. कंपन्या एकूण निधीपैकी 80% परदेशी बाजारातून आणि 20% देशांतर्गत बाजारातून उभारतील.
SL/KA/SL
3 Dec. 2023