हा १५०० कोटींचा ऊर्जा प्रकल्प टाटा समुहाच्या ताब्यात
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा पॉवर लिमिटेडने बिकानेर ट्रान्समिशन रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प ताब्यात घेतला आहे. कंपनीने सांगितले की, बिकानेर-III नीमराना-II ट्रान्समिशन रिन्युएबल एनर्जी प्रकल्पाच्या अधिग्रहणासाठी सुमारे 1,544 कोटी रुपयांची बोली लावून हा प्रोजेक्ट घेतला आहे. हा प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) असून हे युनिट पीएफसी कन्सल्टिंगने स्थापन केले आहे.
टाटा पॉवरने एका निवेदनात म्हटले की, कंपनीने भारतात अक्षय ऊर्जा ट्रान्समिशन पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी ते अधिग्रहण केले आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टॅरिफ आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेत यशस्वी झाल्यानंतर कंपनीला इरादा पत्र (Letter of Intent) प्राप्त झाले.
हा प्रकल्प बांधा, स्वतः चालवा, हस्तांतरीत करा (BOOT) तत्त्वावर विकसित केला जाईल. यासह राजस्थानमधील बिकानेर संकुलातून 7,700 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण केली जाईल. बिकानेर-3 पूलिंग स्टेशन ते नीमराना 2 सबस्टेशनपर्यंत 340 किमी लांबीच्या ट्रान्समिशन कॉरिडॉरची स्थापना या प्रकल्पात समाविष्ट आहे. टाटा पॉवर 35 वर्षे पारेषण प्रकल्पाची देखभाल करेल. त्याची अंदाजे किंमत 1,544 कोटी रुपये आहे. स्पेशल पर्पज व्हेईकलच्या हस्तांतरणाच्या तारखेपासून 24 महिन्यांच्या आत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
SL/KA/SL
3 Dec. 2023