गजलामृत या गजलसंग्रहाला आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे या संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित आंतरराष्ट्रीय तितिक्षा साहित्य संमेलनात डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या गजलामृत या गजलसंग्रहाला तितिक्षा इंटरनॅशनल ग्रंथ पुरस्कार 2023 प्रदान करून पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्रात ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रोत्रिय, डॉ. मधुसूदन घाणेकर, तीतिक्षा इंटरनॅशनल च्या अध्यक्षा प्रिय दामले आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.गजलामृत या गझलसंग्रहाला लाभलेला हा दुसरा पुरस्कार आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रातील आणि प्रकारातील अनेक गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.
ML/KA/SL
3 Dec. 2023