कासवाने साजरा केला १९१ वा वाढदिवस

सेंट हेलेना, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कासव हा पृथ्वीवरील सर्वांत जास्त जगणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली असलेल्या कासवांबाबत सर्वांनाच कुतुहल असते. जोनाथन असे नाव असणाऱ्या कासवाने, सेंट हेलेना नावाच्या बेटावर [island of St. Helena] आपला १९१ वा वाढदिवस साजरा केल्याचे गिनीज बुकच्या एका व्हिडीओमधून आपल्याला समजते.
परंतु, त्यांच्याच एका विधानामध्ये गिनीज बुक असे म्हणतात की, पूर्व आफ्रिकेमधील सेशेल्स [Seychelles] मधून जोनाथनला जेव्हा १८८२ साली सेंट हेलेना या बेटावर आणले गेले, तेव्हा हे कासव किमान ५० वर्षांचे तरी असेल आणि म्हणून या कासवाचे नेमके वय काय हे सांगता येणार नाही. जोनाथन ज्या जातीचे कासव आहे, त्या जातींची कासवे साधारण १५० वर्षांपर्यंतच जिवंत राहू शकतात. परंतु, जोनाथनने मात्र तो आकडा केव्हाच पार केला असून आता तो आपला १९१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
जोनाथन हा अजूनही अतिशय निरोगी असल्याचे त्याच्या पशुवैद्याने म्हणजेच जो होलिन्स यांनी गिनीज बुकला दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
SL/KA/SL
2 Dec. 2023