ही भारतीय कंपनी करत आहे स्वस्त iPhone चे उत्पादन

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशातील तरुणवर्गामध्ये iPhone ची क्रेझ वाढली आहे. परंतु हा फोन महाग असल्यामुळे तो प्रत्येकाच्या खिशाला परवडतोच असे नाही. तरुणाईची iPhone ची आवड लक्षात घेऊन Tata Electronics आता भारतात आयफोनचे उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाने आयफोनचे प्रो मॉडेल भारतात तयार केल्यास हाय-एंड आयफोनच्या किंमती कमी होऊ शकतात.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत सांगितले की, टाटा समूह देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी Apple iPhoneची निर्मिती देशात करेल. टाटा समूहाने विस्ट्रॉनच्या युनिटचे कामकाज हाती घेतल्याबद्दल आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी टाटा समूहाचे अभिनंदन केले. टाटा समूह हा पहिला देशांतर्गत आयफोन उत्पादक बनणार आहे.
एका अहवालानुसार, कंपनी तामिळनाडूच्या होसूरमध्ये आयफोन केसिंग प्रॉडक्शन प्लांटचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आयफोन-केसिंग प्लांटचा क्षेत्र आणि प्लांटची क्षमता दुप्पट वाढवण्याची शक्यता आहे.Tata Electronicsने iPhone 15 सिरीजचे उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रॉडक्शन प्लांटचा विस्तार करणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, टाटा कंपनीने होसूर प्लांटमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. प्रकल्पाचा विस्तार केल्याने तेथे रोजगाराला चालना मिळणार आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा प्रकल्प होसूरमध्ये 500 एकर जमिनीवर वसलेला आहे. या प्रकल्पात १५ हजारपेक्षा जास्त कामगार काम करीत असून प्रकल्पाचा विस्तार केल्याने कामगारांची संख्या 25 हजार ते 28 हजार कामगारांपर्यंत पोहोचू शकते.
SL/KA/SL
1 Dec. 2023